नाशिक : लागोपाठच्या सुट्यांमुळे बॅँका सलग चार दिवस बंद राहणार असून, एका दिवसाच्या कामकाजानंतर पुन्हा सुटी मिळणार असल्याने पुढच्या आठवड्यात त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.चालू आठवड्यात दि. १२ रोजी दुसरा शनिवार असून, दि. १३ रोजी रविवारची सुटी, १४ रोजी गोकुळाष्टमी व १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिन असे चार दिवस बॅँकांचे कामकाज बंद राहणार असल्याने बुधवारपासूनच अनेक व्यापारी, व्यावसायिकांनी पुढच्या आठवड्यातील बॅँकिंग व्यवहार पूर्ण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. १५ आॅगस्टच्या सुटीनंतर १६ रोजी कामकाजाचा दिवस असून, १७ आॅगस्टला पुन्हा पतेतीची सुटी राहणार आहे. त्याचप्रमाणे चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातदेखील २५ ते २७ सलग तीन दिवस बॅँका बंद राहणार आहेत.शुक्रवार, दि. २५ रोजी गणेश चतुर्थी, २६ रोजी महिन्यातील चौथा शनिवार व २७ ला रविवार शासकीय सुटीचा दिवस आहे. बॅँकांच्या या सलग सुट्यांमुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चार दिवस बॅँका बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:06 AM