मालेगाव: गेल्या १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दगडफेक व दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या २६ जणांचा गुरुवारी (दि.२४) येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या डी. डी. कुरुळकर यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे, तर चाैघांचा जामीन नाकारला आहे. आतापर्यंत सर्वाधिक जण जामिनावर सुटले आहेत. यापूर्वी नगरसेवक मुस्तकींम डिंगनिटी, अब्दुल रहमान शाह, जिया मुस्कान या अशा पाच जणांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.
गुरुवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात एका गुन्ह्यातील ३० जणांचा जामीन जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. या पैकी २६ जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर चार जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला आहे. त्यांच्याकडे पाईप, काठी आढळून आल्यामुळे त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे.