शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

शहरात विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:35 AM

शहरात विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी दोघांनी गळफास तर टायफाईड व अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : शहरात विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी दोघांनी गळफास तर टायफाईड व अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  गंगापूर रोडवरील सोमेश्वर गेटसमोरील १९ वर्षीय युवकाने घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास घडली़ सुरेश बुधा धनगर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़इंदिरानगरच्या गामणे मळा परिसरातील १८ वर्षीय युवतीने घरातील फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास घडली़ रुपाली रामधवन वर्मा (रा़ शांतीदर्शन अपार्टमेंट) असे आत्महत्या करणाºया युवतीचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़भरधाव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी औरंगाबाद महामार्गावर घडली़ मुकेश यादव (रा़ नानावली, द्वारका, मूळ रा़ विजयपूर, मध्य प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत यादव यास औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल ते सिद्धिविनायक लॉन्सदरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिली होती़ यामध्ये त्याच्या चेहºयास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़टायफाईडच्या आजाराने २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१०) मध्यरात्रीच्या सुमारास चुंचाळे शिवारात घडली़ सगुणा भगवान जाधव (घरकुल योजना, चुंचाळे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़राणेनगर येथील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणीराणेनगर परिसरातील नागरिक पेट्रोल चोर, टवाळखोर तसेच भुरटे चोरांमुळे त्रस्त झाले असून चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या सिडको विभागाचे कार्याध्यक्ष विक्र ांत डहाळे यांनी केली आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना नुकतेच या आशयाचे निवेदन देण्यात आले.४या परिसरात पेट्रोल तसेच इतर प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करवा लागत आहे. त्यामुळे चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कार्याध्यक्ष विक्रांत डहाळे यांनी केली आहे. यावेळी चिन्मय गाढे, विशाल डोखे, सुनील घुगे, सुरजित सिंग, स्वप्नील चुंभळे, सागर देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी