औंदाणे : नांदीन (ता. बागलाण) येथील शेतकरी तुकाराम नारायण देवरे यांच्या घराशेजारील वाड्यात बांधलेल्या चार शेळ्यांना बिबट्याने फस्त केले. त्यामुळे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. येथे डोंगर असल्याने सध्या अन्न पाणी मिळत नसल्याने अन्नाच्या शोधात बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या सुमारास देवरे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या वाड्यात शेळ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास चार शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून फस्त केल्या. या घटनेची माहिती मिळताच वनपाल व्ही.एस. गिते यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच अमित पवार, उपसरपंच पोपट नेरकर, कैलास बोरसे, अनिल शिंदे, सुनील शिंदे, भाऊसाहेब पानपाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बिबट्याकडून चार शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 7:06 PM