सोमवारी (दि.२३) पहाटे तीन वाजता लांडग्यांनी या शेळ्यांवर हल्ला चढविला. या आधी लोहोणेर परिसरात दोन ठिकाणी लांडग्यांनी शेळ्यांवर हल्ला चढविला होता. आतापर्यंत सुमारे पंधरा शेळ्या व बोकड मरण पावले असून पुन्हा लांडग्यांनी जाधव यांच्या शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे लोहोणेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत वनविभागाचे वनपाल डी. पी. गवळी, एल. डी. इवले, तुषार भामरे, राकेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या वीस दिवसांत लोहोणेर परिसरात तीनवेळा लाडग्यांच्या कळपाने शेळ्यांवर आपला हल्ला चढविल्यामुळे शेतकरीवर्गात भीती निर्माण झाली असून वनविभागाने या लांडग्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पशुपालक व शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.
240821\img-20210824-wa0177.jpg
लोहोणेर : - येथील शेतकरी भिका खंडू जाधव यांच्या मालकीच्या शेळ्यावर लाडग्यांनी हल्ला चढविल्या मृत्यू मुखी पडलेल्या शेळ्या