ओझर : येथे मुंबई आग्रा महामार्गावर खंडेराव मंदिर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सुमारे चार तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्ग पोलिसांनी भरधुळीत उभे राहून वाहनांना एकेरी वाट करून दिली.ओझरला लागून असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर सहापदरी काम यापूर्वीच झालेले होते. परंतु वाहतूक कोंडी लक्षात घेता येथील गडाख पॉर्इंट आणि खंडेराव मंदिर समोर उड्डाणपूल करण्याचे ठरले, त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने सर्विसरोड वरून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यात बुधवारी या रोडवर अचानक पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलीस चौकीच्या निरीक्षक वर्षा कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोंडीच्या ठिकाणी येत चार तास उभे राहता वाहनांना मोकळी वाट करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यात गरवारे पॉइंट येथे शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी महामार्गावर बॅरिकेटस् लावत मार्चपासून अद्याप पावेतो पावती फाड मोहीम जोमाने दंग असून सदर कर्मचाऱ्यांना इतक्या मोठ्या वाहतूक कोंडीचा थांगपत्ता देखील लागला नाही. तर ओझरगावाची वाढलेली लोकसंख्या व वाहनांची रोजची वर्दळ पाहता केवळ दोनच वाहतूक कर्मचारी देण्यात आले आहेत. आधीच ओझर पोलीस ठाण्यात लोकसंख्येचा व वाहनांचा विचार करता पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर जोपर्यंत उड्डाणपूल पूर्णत्वास येत नाही तोवर देखील वाहतूक पोलीस वाढवून द्यावे इतकीच अपेक्षा ओझरवासियांनी व्यक्त केली आहे.
ओझरला चार तास ट्रॅफिक जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 9:01 PM
ओझर : येथे मुंबई आग्रा महामार्गावर खंडेराव मंदिर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सुमारे चार तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्ग पोलिसांनी भरधुळीत उभे राहून वाहनांना एकेरी वाट करून दिली.
ठळक मुद्देपोलिसांची गरवारेला मात्र पावती फाड मोहीम जोमात