सटाणा : तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरु षोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्र मांक १३/१ मधील शेतातील तयार झालेले डाळिंब अंदाजे चारशे किलो डाळिंबांची चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने चोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. चार चोरट्यांनी कुंपण उचकटून डाळिंबाच्या बागेत प्रवेश करीत आठ गोणीत भरले व चार दुचाकीच्या सहाय्याने पहाटेच्या सुमारास नामपुर येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या प्रवेशाव्दारावर पोहोचले. शेतकरी पुरु षोत्तम भामरे यांनी काही शेतकºयांच्या मदतीने यांच्यावर नजर ठेऊन होते. बाजार समितीच्या प्रवेशद्वारापाशी चोरटे छबू बंडू आहिरे (रा.ताहाराबाद), कारभारी बापू पवार (रा. जाखोड), राजेंद्र दोधा आहिरे (रा.ताहाराबाद) व मनोहर राजेंद्र आहिरे (रा.ताहाराबाद) हे चौघे पोहचताच शेतकºयांनी हटकले असता त्यांनी तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. यात छबू आहिरे, कारभारी आहिरे यांना पकडून ठेवले व राजेंद्र आहिरे व मनोहर आहिरे हे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले. पहाटे पोलिस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, हवालदार दिपक भगत, सुनिल पाटिल त्यांना प्रवेशद्वारापाशी गर्दी दिसली विचारपूस केली असता डाळिंबाची चोरी केल्याने शेतकर्यांनी पकडून ठेवले होते. पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतलेपुरुषोत्तम भामरे यांनी या चोरट्यांविरोधात जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून चार दुचाकीसह चारशे किलो वजनाचे आठ गोणी असा एकून एक लाख आठ हजार रूपयांचा ऐवज जप्त केले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिपक भगत, सुनिल पाटिल करीत आहेत.
सटाण्यात चारशे किलो डाळिंबाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 3:31 PM