सटाणा : शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. बुधवारी (दि.२७) दुपारी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. रुग्ण सापडताच बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांनी मुख्यबाजार पेठेसह जुने सटाणा शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.शहरातील भर बाजारपेठेत दोन रुग्ण आढळल्याने प्रशासनाची अक्षरश: झोप उडाली असून दोघांच्या संपर्कात आलेल्या पन्नासहून अधिक जणांचा शोध प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान बाधित रुग्णाच्या संपर्कात काही राजकीय व्यक्ती आल्याचे बोलले जात असून त्यांना आता विलगीकरण केंद्रात भरती व्हावे लागणार आहे. सटाणा शहरासह तालुक्यातील टेंभे (वरचे) येथील एकूण चौदा जणांना अजमिर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात भरती केले होते.शहरातील भर बाजारपेठेत राहणारे पती-पत्नी मालेगावच्या संपर्कात आले. आठ दिवसानंतर त्रास जाणवू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोघांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना गेल्या आठवड्यात अजमिर सौंदाणेयेथील विलगीकरण केंद्रात भरती केले होते. तर टेंभे (वरचे )येथे मुंबईहून एक वृद्ध महिला नातेवाईकाकडे मुक्कामी आली होती. त्या महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तिच्या संपर्कातील बारा जणांना विलगीकरण केंद्रात भरती केले होते.दरम्यान हे अहवाल प्राप्त होताच प्रांताधिकारी भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांची एकत्रित बैठक घेऊन शहरातील देना बँकेपासून तीनशे मीटर पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात मेडिकल, हॉस्पिटल वगळता सर्वच व्यवहार बंद राहतील असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.---------------४सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठ व जुने गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. तसेच टेंभे (वरचे) गाव सील करण्यात आले असून, या भागात बाधित रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. शहरातील रु ग्णाच्या संपर्कात पन्नासहून अधिक जण आले असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरुआहे.------------------४चौदा जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र किट्स उपलब्ध नसल्याने त्यांचे अहवाल सहा दिवसांपासून रखडले होते. बुधवारी दुपारी चौदा जणांचे अहवाल प्राप्त झाले असून शहरातील पती-पत्नीसह टेंभे (वरचे) येथील दहा वर्षांचा मुलगा आणि पन्नास वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.