इंदिरानगर : मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या गेल्या दोन महिन्यांत बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांमागे गुन्हेगारीत वाढ व अवैध धंदे रोखण्यात आलेले अपयश असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करूनही उपरोक्त प्रकार सुरूच असून, याच कारणावरून यापूर्वी बदली केलेल्या विजय ढमाळ यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगर, शिवाजीवाडी, नंदिनीनगरसह परिसरात दिवसागणिक झोपड्या वाढत असून, त्याचबरोबर अवैध धंदे वाढत आहे. यामध्ये मटका, जुगार, गांजा विक्री आणि कत्तलखाने सर्रास सुरू आहे. या अवैध धंद्यांमुळे व्यावसायिकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून, त्यातून अनेक वेळेस हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत; परंतु त्याला आळा घालण्यास मुंबई नाका पोलीस ठाणे अपयशी ठरले आहे.या भागातील अवैध धंद्यांवर आत्तापर्यंत गुन्हे शाखेच्या युनिट १ व २ च्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेक वेळेस छापे टाकून कारवाई केली आहे. गुन्हे शाखेला अवैध धंद्यांची खबर लागते, परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई नाका पोलिसांना त्याची खबर नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांच्या बदल्या करूनही परिस्थिती जैसे थे राहत असून, हा प्रयोग किती वेळा करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. विजय ढमाळ यांनी यापूर्वीही मुंबई नाका पोलीस ठाण्यात काम केले असल्याने त्यांना हद्दीतील खडान खडा माहिती असून, आता नव्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण व अवैध धंद्यांचा बीमोड करून ते पुन्हा बदलीला पात्र ठरणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.याच कारणावरून गेल्या दोन महिन्यांत पोलीस ठाण्याच्या चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात अनुक्रमे विजय ढमाळ, नारायण न्याहळदे, साजन सोनवणे यांचा समावेश असून, आता पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजय ढमाळ यांचीच नेमणूक करण्यात आली आहे.
दोन महिन्यांत चार निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 10:59 PM
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या गेल्या दोन महिन्यांत बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांमागे गुन्हेगारीत वाढ व अवैध धंदे रोखण्यात आलेले अपयश असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करूनही उपरोक्त प्रकार सुरूच असून, याच कारणावरून यापूर्वी बदली केलेल्या विजय ढमाळ यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठळक मुद्देमुंबई नाका : बदल्या करूनही परिस्थिती ‘जैसे थे’