शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
4
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
5
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
6
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
7
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
8
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
9
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
10
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
11
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
12
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
13
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
14
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
15
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
16
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
17
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

मालेगावी वेगवेगळ्या अपघातात चार ठार

By admin | Published: November 22, 2015 11:09 PM

दुचाकी : मुंगसे शिवारात कारची धडक; नामपूर रस्त्यावर नियंत्रण सुटले

मालेगाव : तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार दुचाकीस्वार ठार झाले़ मुंबई- आग्रा महामार्गावरील मुंगसे शिवारात कारने दुचाकीला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला़ मनमाड-मालेगाव रस्त्यावर मनमाड चौफुलीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने मनमाड येथील दुचाकीस्वार ठार झाला़ तर तिसऱ्या घटनेत नामपूर- मालेगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून दोनजण जागीच ठार झाले़ या सर्व घटनांची संबंधित पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून, पुढील तपास सुरू आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावर मुंगसे शिवारात दुसाने पेट्रोल पंपाजवळ नाशिककडून मालेगावकडे जाणाऱ्या मोटार कारने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक मारून तिच्यावरील चालकाच्या मृत्यूस तसेच पाठीमागील बसलेल्या महिला व एका पादचाऱ्याच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. जमादार एस. पी. पवार यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. मोटार कार क्रमांक एमएच ०५ व्हीजे ४३० वरील चालक अमोल राजेंद्र मथुरकर रा. डोंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे याने पुढे चालणारी दुचाकी क्रमांक एमएच ४१ डब्ल्यू ७७५२ हिला पाठीमागून धडक मारून दुचाकीस्वार दादाजी महादू सूर्यवंशी (५५) रा.मुंगसे यांच्या मृत्यूस व त्यांच्या पाठीमागे बसलेली पत्नी ताराबाई दादाजी सूर्यवंशी व पादचारी भाऊसाहेब जगन्नाथ घुगे रा. रोझे या दोघांच्या गंभीर दुखापतीस तसेच दोन्ही वाहनांच्या ४२ हजारांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार मोरे करीत आहेत.वाहनाची धडकमनमाड - मालेगाव रस्त्यावर मनमाड चौफुलीजवळ राजस्थान ढाब्याजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या अकस्मात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यशवंत राणा चौधरी (४५) रा. मनमाड हा दुचाकीस्वार ठार झाला. शनिवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हरीभाऊ नामदेव अमलूक या हॉटेल चालकाने किल्ला पोलिसात फिर्याद दिली. दुचाकी क्रमांक एमएच ४१ एचओ ५६६५ हिला अज्ञात वाहन चालकाने धडक देवून अपघात केला. अपघातात दुचाकीस्वार यशवंत चौधरी यांच्या मृत्यूस तसेच दुचाकीचे नुकसान करुन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार सोनवणे करीत आहेत.(प्रतिनिधी)दुचाकी झाडावर आदळलीनामपूर : मालेगाव रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने दोन जण जागीच ठार झाले. शनिवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान कोठरे फाट्याजवळ अपघात झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला. नामपूर रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या नव्या होण्डा शाईन दुचाकीवरील चालक पुष्पक दगाजी देवरे (१९) रा. निताणे, ता. सटाणा याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडावर आदळली यात पुष्पक देवरे व सहप्रवासी आण्णा पुंडलिक मोरे (६५) रा. मल्हारवाडी, नांदगाव हे दोघे जागीच ठार झाले. त्यांच्या सोबत असलेला सुरेश भाऊसाहेब मोरे रा. मल्हारवाडी, नांदगाव हा गंभीर जखमी झाला. वडनेर खाकुर्डी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.