नाशिक : शहरातील विविध उपनगरीय भागांमध्ये झालेल्या सात अपघातांच्या घटनांमध्ये चार ठार, तर नऊ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपघातांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काठे गल्ली सिग्नलवरून पायी जात असलेले मधू सदन गोराई (३०, मूळ रा. धनबाद, झारखंड) यांना आयशर ट्रकने (डीएन ०९ के ९२४६) जोरदार धडक दिली. या धडकेत मधू यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ट्रकचालक पांडुरंग दिगंबर इमडे (३५, रा. नांदेड) याने घटनास्थळावरून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त वाहन सोडून पळ काढला होता. या प्रकरणी पोलीस नाईक सुरेश गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी उपनिरीक्षक एस. सी. कासर्ले यांनी तपास करत पहाटेच्या सुमारास पांडुरंग यास अटक केली.दुसऱ्या घटनेत गंगापूररोड-हनुमानवाडी लिंकरोडवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार सुनील दौलत महाले हा दुभाजकावर जाऊन आदळला. महाले दुचाकीवरून (एमएच १५ बीए ६२८२) विना हेल्मेट भरधाव जात असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने महाले याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तिस-या घटनेत नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रवास करत असताना शिवाजी तुकाराम गुंजाळ (५५, रा. शिखरेवाडी) हे दुचाकीवरून जात असताना चक्कर आल्याने तोल जाऊन दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी रोडवरून पायी जाणारा युवक पिंटू काळू सीध (२५, रा. देवगाव, त्र्यंबकेश्वर) याचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रकचालकाने त्याला जबर धडक दिली. अनोळखी ट्रकचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. पोपट चंदू देहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एमएच ०४ एच ३१७२ या अपघातग्रस्त चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.----
सात अपघात: नाशिकमधील उपनगरांत चार ठार; नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:02 PM
त अपघातांच्या घटनांमध्ये चार ठार, तर नऊ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपघातांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देएका अपघातात सहा जखमी अपघातग्रस्त वाहन सोडून पळ काढला