शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 1:40 AM

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांच्या शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, यामध्ये दुसºयांदा पिके वाया जाणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. पेठ तालुका वगळता १६२१ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत.आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने सात तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालावरून या पावसामुळे मालेगाव तालुक्यातील १५० गावे बाधित झाली आहेत, तर बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ८१,१६९ इतकी आहे.सटाणा तालुक्यातील २३५ गावांमधील ५४,२१२, नांदगाव तालुक्यात १०० गावांतील ३७,५१३, कळवणमधील १५० गावांतून ३०,२४१, दिंडोरीतील १०५ गावांमधून ८,२४०, देवळा येथील ४६ गावे बाधित झाली आहेत, तर नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या २६,५८९ इतकी आहे. सुरगाणा येथील ६ गावांमधील ४६ शेतकरी, नाशिक तालुक्यातील ७७ गावांमधील अंदाजे ५ हजार शेतकरी, इगतपुरीतील १२७ गावांमधून १५४१, त्र्यंबकेश्वरला बाधित झालेल्या १२५ गावांमधील १३,५७०, निफाड १३६ गावांमधील ६२,६८५, चांदवड तालुक्यातील ११२ गावांमधील ५८,५६१, येवला येथील १२४ गावांमधून २९,२३४ तर सिन्नरमधील १२८ गावांतील ४८,३३० शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ४ लाख ५६ हजार ९३१ इतकी असल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.क्यार वादळामुळे महाराष्टÑात आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने बदललेल्या वातावरणाचा फटका शेतपिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.आॅक्टोबरमध्ये पाऊस परतीला लागत असल्यामुळे त्यादृष्टीने शेतकºयांकडून पिकांचे नियोजन केले जाते; परंतु लहरी वातावरणामुळे शेतकºयांचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडलेआणि आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे तर शेतकºयांचे कंबरडे मोडलेआहे.शेतातील पिकांचे नुकसान झालेच शिवाय काढणीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टरवर द्राक्षबागा, ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन, २.२५ लाख हेक्टरवरील मका, तसेच काही हजार हेक्टरवर बाजरी पीक घेण्यात आले आहे. या पिकांसह भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूर