नाशिक : विभागात बोगस सोयाबीन बियाणांबाबत एकूण ३५५ तक्रारी दाखल झाल्या असून, बहुतेक तक्रारींची तालुकास्तरावर तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, विभागात रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोठेही खतांची टंचाई नसल्याचा दावा विभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.विभागात रासायनिक खतांचा एकूण ४ लाख १३ हजार ३९४ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.
सर्वाधिक साठा नाशिक (१३९४१३ ) तर सर्वात कमी साठा नंदुरबार ( ६२६१४ ) जिल्ह्यात आहे. जळगाव जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ५६८ तर धुळे जिल्ह्यात ७३ हजार ८२८ मेट्रिक टन साठा आहे. नाशिक जिल्ह्यासाठी युरियाचे ८३१६० मेट्रिक टन इतके आवंटन मंजूर झाले असून, त्यापैकी ५२ हजार ३३५ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला आहे. मार्च अखेर जिल्ह्यात २३२५ मेट्रिक टन साठा शिल्लक होता. त्यमुळे सध्या जिल्ह्यात ५४ हजार ६५९ मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.