न्यायडोंगरी : दोन दिवसांपूर्वी वादळी वाºयात महाराष्ट्रातील यंदाच्या पावसाळ्याचा वीज पडून पहिला बळी गेलेल्याच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाचा धनादेश घरपोच प्रदान करण्यात आला.नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथे गुरु वारी (दि.६) वीज पडून बाळू देवराम सावंत या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरु ष गमावल्याने यातून कसे सावरायचे या विवंचनेत कुटुंबावर मोठे संकट असतानाच, नांदगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पंचायत समिती सभापती विद्या पाटील यांच्या समवेत या कुटुंबाच्या तातडीने घरी जाऊन चार लाखाचा धनादेश पत्नी लहानु सावंत यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.यावेळी गावचे पोलीस पाटील सोमनाथ पाटील, पंचायत समिती उपसभापती सुभाष कुटे कुटुंबातील इतर सदस्य व नागरीक उपस्थित होते. महसूल विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सावंत यांच्या कुटुंबाला थोडा का होईना आधार मिळाल्या मुळे गावकºयांनी समाधान व्यक्त केले.(फोटो १० न्यायडोंगरी)
वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदतीचा चार लाखाचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 5:59 PM
न्यायडोंगरी : दोन दिवसांपूर्वी वादळी वाºयात महाराष्ट्रातील यंदाच्या पावसाळ्याचा वीज पडून पहिला बळी गेलेल्याच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाचा धनादेश घरपोच प्रदान करण्यात आला.
ठळक मुद्दे शासनाकडून चार लाखाचा धनादेश घरपोच प्रदान