सटाणा: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करीत असतांना बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सावकार व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे सटाणा शहराध्यक्ष मयूर अहिरे यांनी अचानक राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाकडे आपल्या पदांचे राजीनामे पाठविल्याने बागलाण तालुका राष्ट्रवादीसह तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात आजपर्यंत सक्र ीय सहभाग नोंदविलेला असतांना आगामी काळात व्यक्तिगत कारणास्तव पक्षासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे चौघा पदाधिकाºयांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. पक्षासाठी सर्वस्व पणाला लावून आजपर्यंत कार्य केलेले असतांना पक्षात मानसन्मान मिळत नसल्यानेच चौघा पदाधिकाºयांनी राजीनामास्त्र उगारल्याची चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,राष्ट्रवादी पक्षाच्या चार प्रमुख पदाधिकाºयांनी राजीनामे दिल्याचे मलाही समजले.आगामी काळात पक्षातील विविध पदांचे फेरबदल होणार असल्याने चौघांनी राजीनामे दिले आहेत. आगामी काळात हे चारही पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाची एकनिष्ठ राहतील असा विश्वास आहे. त्यांनी केवळ पदांचे राजीनामे दिले आहेत.राष्ट्रवादी पक्षात ते कायम असून आगामी काळात त्यांची याहून चांगल्या पदांवर वर्णी लावली जाईल असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 2:28 PM