पंचवटी : परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या तसेच भाजीबाजारात ग्राहकांची नजर चुकवत हातोहात मोबाईल लंपास करणाऱ्या संशयित आरोपींकडून पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी तसेच 11 मोबाईल असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली असून यात एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे असे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सिडकोतील राहुल कैलास खैरनार व त्याचा विधी संघर्षित साथीदार अशा दोघांनी परिसरातून दुचाकी चोरून दोघेजण पंचवटी कॉलेज परिसरात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांना मिळाली त्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे हवालदार संजय वानखेडे, सुरेश नरवडे, महेश साळुंखे, संदीप शेळके, विलास चारोस्कर,, दिलीप बोंबले, गीता रहाणे आदींनी सापळा रचून खैरनारला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने इंदिरानगर तसेच महसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एफ झेड, बजाज डिस्कवर, हिरोहोंडा शाइन अशा 4 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 2 लाख 45 हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत केल्या आहे तर दुसर्या घटनेत मोबाईल चोरी करणाऱ्या गणेश तानाजी दातीर,विजय सोमनाथ आचारी, कृष्ण हरीजी पटेल या तिघांना अटक केली आहे संशयितांनी भाजीबाजार नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती परिसर या भागातून मोबाईल चोरी केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल हस्तगत केले आहे या संशयितांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चार दुचाकीसह 11 मोबाईल जप्त; चौघा संशयिताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 6:53 PM
पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल हस्तगत केले आहे या संशयितांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्दे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत