नाशिक : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाºया एसटी महामंडळाच्या नाशिक आगाराच्या ताफ्यात आणखी चार शिवशाही बसेस दाखल झाल्या असून, त्या रविवारपासून (दि.३) नाशिक-बोरिवली या मार्गावर धावणार आहेत. आता नाशिकच्या ताफ्यात आधुनिक बनावटीच्या, अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज अशा २१ शिवशाही बसेस आल्या असून, त्यातील १६ बसेस नाशिक-पुणे मार्गावर धावत आहेत. एक बस नाशिक-मंत्रालय या मार्गावर असून, नव्याने दाखल झालेल्या या बस बोरिवलीसाठी वापरण्यात येणार आहेत. बोरिवलीसाठी नाशिकहून पहाटे ५.३० वाजता, ६.३० वाजता, ७.३० वाजता, ८.३० वाजता, दुपारी २.३० वाजता, ३.३० वाजता, ४.४५ वाजता या वेळांवर महामार्ग बसस्थानकातून बसेस धावणार असून, बोरिवलीहून नाशिकला येण्यासाठी दुपारी १.४५ वाजता, २.४० वाजता, ३.४० वाजता, ४.४० वाजता, १०.५० वाजता, ११.५० वाजता, १२.५० वाजता या वेळांवर प्रवाशांना उपलब्ध होतील. या बसचा मार्ग नाशिक महामार्ग बसस्थानक- पाथर्डी फाटा-खर्डी-शहापूर-सुकूर बावडी यामार्गे बोरिवली असा असेल. बसमध्ये पूर्णपणे वातानुकूलित, लगेज स्पेस, सीसीटीव्ही कॅमेरे, महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, डिजिटल घड्याळ, चार्जिंग सॉकेट, अंतर्गत सोयीसुविधा आणि किफायतशीर दर यामुळे नाशिक-पुणे शिवशाहीला प्रतिसाद लाभत आहे.
नाशिकला आणखी चार ‘शिवशाही’प्रवाशांच्या सेवेसाठी : पुणे, मुंबईचा प्रवास झाला आरामदायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:58 AM
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाºया एसटी महामंडळाच्या नाशिक आगाराच्या ताफ्यात आणखी चार शिवशाही बसेस दाखल झाल्या
ठळक मुद्देसोयीसुविधांनी सज्ज २१ शिवशाही बसेसबस पूर्णपणे वातानुकूलित