पेठ (नाशिक) - आगाराची बुधवारी (16 जानेवारी) सकाळी पेठहून सुटलेली पेठ-पुणे ही बस 6.30 वाजेच्या सुमारास गोळशी फाटा परिसरात पलटी झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पेठ आगाराची पुणे बस क्रमांक एमएच -20 -बीएल -4248 नाशिककडे येत असताना सावळघाट चढून वर आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. यामध्ये प्रवाशी जखमी झाले असून बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.