भारतनगर येथील मशिदीच्या पाठीमागे असलेल्या चाळीतील-४ क्रमांकाच्या खोलीत सहा कामगार युवक भाडेतत्त्वावर एकत्र राहत होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता अचानकपणे स्फोट होऊन भडका उडाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, घराचे पत्र्याचे छप्पर तर उडालेच; मात्र छप्परवर केलेले सिमेंट-विटांचे बांधकामही कोसळून पडले. दरम्यान,परिसरातील रहिवाशांनी तत्काळ जखमींना दवाखान्यात दाखल केले. रशिद लतिफ अन्सारी (३०), मोहम्मद अमजद अब्दुल रऊफ अन्सारी (३०), मोहम्मद मुर्तुजा अन्सारी (३०) मोहम्मद आफताब आलम (१९) यांचा आज मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृतीही गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरमालकासह भाडेकरू असलेल्या जखमी आणि मृतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे व्यावसायिक गॅसचा घरगुती वापर तसेच नादुरूस्त झालेली गॅसची नळी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत स्वत:सह परिसरातील नागरिकांच्या घरांना आगीचा धोका पोहोचविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्यात भाडेकरूची माहिती लपविल्याप्रकरणी घरमालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
फोटो आर वर ०१पीएचडीसी६२/६४