मनमाड :- हिसवळ बुद्रुक ता: नांदगाव येथे शेतात जाणाऱ्या चार जणांवर लांडग्यांने हल्ला केला असून त्यात दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहे.जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.हिसवळ येथे आज सकाळी मीना आहेर(वय-45),सुनीता पवार(वय 35), जगन आहेर(वय 65) आणि मोहन सोळसे(वय 30) हे चार जण शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या लांडग्यांने त्यांच्यावर हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या चौघानी आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकून गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे लांडगा पळून गेला.काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला लाठ्याकाठ्यानी मारण्याचा प्रयत्न केला मात्र लांडगा जंगलात पसार झाला.चार ही जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी डी.बी.बोरसे,डी.जी.सुर्यवंशी,सी.इ.भुजबळ,अशोक सोनावणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.मनमाडसह नांदगाव तालुक्यात वनविभागाचे मोठे जंगल असुन त्यात हरीण,मोर,ससे,लांडगे यासह इतर वन्यप्राणी असुन गावात येवून लांडग्यांने लोकांवर हल्ला केल्याची या भागात ही पहिलीच घटना मानली जात आहे