शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मनमाड-मालेगाव रोडवर भीषण अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 6:04 PM

मनमाड : मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात भरधाव वेगातील टॅँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मयतामधे पती-पत्नीसह माय-लेकाचा समावेश आहे. दरम्यान, सदरची घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

मनमाड : मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात भरधाव वेगातील टॅँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मयतामधे पती-पत्नीसह माय-लेकाचा समावेश आहे. दरम्यान, सदरची घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.मालेगाव रोडवरील दहेगाव शिवारात पाटील पेट्रोलपंपाजवळ मालेगावकडून मनमाडकडे येत असलेल्या होंडा शाईन गाडीला मालेगावकडून भरधाव वेगात आलेल्या टॅँकरने जोरदार धडक दिली. अपघातानंतर टॅँकरचालकाने टॅँकर पेट्रोलपंपासमोर उभा करून घटनास्थळावरून पळ काढला. अपघात इतका भयानक होता की मोटारसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातामधे संतोष रामभाऊ चितळकर (३५), आशाबाई संतोष चितळकर (३०), भूषण उत्तम चितळकर (१०), सर्व रा. बोयेगाव, ता. नांदगाव हे तिघेजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी सविता उत्तम चितळकर (४०) यांचे मालेगाव येथे उपचार सुरू असताना निधन झाले.रोषन संतोष चितळकर (१०), रा. बोयेगाव याच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मयतांच्या नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मालेगाव येथे उपचार सुरू असलेल्या सविता चितळकर यांच्या निधनाची माहिती कळताच नातेवाइकांच्या संतापाचा उद्रेक झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.