गोदावरीच्या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावर असलेले चार रोहित्रं सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. सदर रोहित्रे हे वाणिज्यिक असून, यामुळे घरगुती वीजपुरवठ्यावर कुठलाही परिणाम झाला नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला. पाणी वाढल्यास आणखी रोहित्र बंद करण्यात येणार आहे.शासकीय रोपवाटिका पूल, घारपुरे घाटपूल, अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पुलावरून नाशिककरांनी संध्याकाळी नदीचा पहिला पूर बघण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नीळकंठेश्वर महादेव मंदिराच्या रांगेतील सर्व टपऱ्या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. टाळकुटेश्वर मंदिराजवळील सातीआसरा चौकापासून गाडगे महाराज धर्मशाळेकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्यात हरविला होता. त्यामुळे नागरिक वळसा मारून पूर पाहण्यासाठी होळकर पुलाकडे जात होते.वाफाळलेला चहा अन् कांदाभजीगोदाकाठालगत तसेच गंगापूर परिसर, दूधसागर धबधबा, सोमेश्वर मंदिर, भाजीबाजार पटांगण, सरदार चौक, तपोवन या भागात आलेल्या पर्यटकांनी पावसात ओलेचिंब होत वाफाळलेला चहा अन् गरमागरम कांदाभजी व कणसावर ताव मारत पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. संध्याकाळी ६ वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग अधिक वाढल्यामुळे दूधसागर धबधबा व तपोवन गोदाकाठालगतच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने आवरून घेतली.‘दूधसागर’चा रौद्रावतार सोमेश्वरजवळील दूधसागर धबधब्याचा रौद्रावतार सोमवारी नाशिककरांना पहावयास मिळाला. गंगापूर धरणातून जसजसा विसर्ग वाढत होता तसतसा या धबधब्यावरून पाण्याचा प्रतापही वाढत होता. यामुळे नाशिककरांनी या हंगामात प्रथमच दूधसागर धबधब्याचा रौद्रावतार अनुभवला. गंगापूर धरणातून दिवसभर होणाºया विसर्गामुळे धबधब्याच्या परिसरात गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या वतीने मुख्य पादचारी रस्त्यापासून पुढे नदीपात्राजवळ जाण्यासाठी प्रवेशबंद करण्यात आला होता. दोरखंड बांधून नागरिकांना धबधब्यापासून सुरक्षित अंतरावर रोखण्यात आले.