सिन्नर : राज्यात, देशात तसेच जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा सिन्नर तालुक्यात संसर्ग रोखतानाच कुणीही यात बळी जाऊ नये, यासाठी अहोरात्र झटणाºया आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत असूून, बाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना टप्प्याटप्प्याने घरी सोडण्यात येत आहे. सोमवारी (दि. ८) दापूर येथील ९ व १२ वर्षीय दोन मुलींसह ४२ वर्षीय पुरुष, तर कोनांबे येथील २० वर्षीय तरुणीने कोविडवर मात केल्याने त्यांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.राज्यभरात विशेषत: मुंबई, पुणे या शहरात कोरोना धुमाकूळ घालत असताना सिन्नर तालुका कोरोनापासून दूर होता. आरोग्य विभागाने कुठलीही सुुविधा नसताना अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मदतीने कठोर पावले उचलत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले होते. तथापि, गेल्या १५ दिवसात मुंबईसह कोरोनाबाधित क्षेत्रातून तालुक्याच्या ग्रामीण भागात येणाºया नागरिकांमुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली.विशेषत: दापूर येथे दिवसागणिक रुग्ण आढळून येत असल्याने दापूर हॉटस्पॉट ठरले होते. त्याचबरोबर कणकोरी, देशवंडी, फुलेनगर, वडगाव-सिन्नर, पांढुर्ली, पांगरी, गुळवंच, कोनांबे, पिंपळे या छोट्या-मोठ्या खेड्यांमध्ये मुंबईहून आलेल्या नागरिकांत कोरोनाबाधित आढळून आले होते.एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाच्या प्रयत्नांतून रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतत असल्याने कोरोनाच्या संकटातही तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दापूर येथील ९ व १२ वर्षीय मुलींसह ४२ वर्षीय पुरुष, तर कोनांबे येथील २० वर्षीय युवतीला सोमवारी (दि.८) घरी सोडण्यात आले.त्यामुळे आता तालुक्यात केवळ पाच रुग्ण अॅक्टिव्ह असून, त्यापैकी जोशीवाडीतील तरुण, जामगाव येथील ज्येष्ठ महिला या दोघांवर नाशिक येथे, दोडीतील रुग्णावर संगमनेर येथे, तर दापूर येथील दांपत्य अशा २ जणांवर सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.-------------------------दोडीकरांचा जीव भांड्यातशहरातील जोशीवाडी येथील तरुणाच्या संपर्कात आलेल्या खासगी डॉक्टर व नर्ससह त्याच्या कुटुंबातील चार असे एकूण सहा तर दोडी येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन असे नऊ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सिन्नर शहरासह दोडीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाच्या प्रयत्नांतून रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतत असल्याने कोरोनाच्या संकटातही ही दिलासादायक बाब ठरत आहे.
दोन चिमुकल्यांसह चौघांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:18 PM