शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

चार हजार शेतकरी मका पीकविम्यापासून वंचित

By admin | Published: July 18, 2016 12:05 AM

दादा भुसे यांनी प्रश्न सोडवावा : येवल्याच्या शिष्टमंडळाचे मंत्र्यांना साकडे

येवला : राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत तालुक्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी दोन हजार आठशे तेरा हेक्टर मका पिकासाठी १५ लाख २४ हजार ५८४ रुपयांचा विमा हप्ता मुदतीत भरला असूनही संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांच्या विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले.तालुका शिवसेनेच्या वतीने भुसे यांचा सत्कार करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने चांदवड येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल शेलार, शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, वाल्मिक गोरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, पुंडलिक पाचपुते, जगन बोराडे, अरुण काळे, शरद लहरे, प्रमोद पाटील, दत्ता आहेर, जनार्दन खिल्लारे, दिलीप मेंगाळ, शिवाजी धनगे, भास्कर येवले, शरद पवार, कोतीलाल साळवे, साहेबराव सैद, विठ्ठल आठशेरे, मनोहर जावळे, पुंजाराम काळे, धिरज परदेशी, नंदू झांबरे, सुदाम सौंदाणे, प्रकाश साताळकर, विकास निकम, रवि काळे, बी. एन. सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने भुसे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, मका पीकविम्यापासून येवला तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांचा लाभ मिळवून देणे महत्त्वाचे आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या पूर पाण्यातून तालुक्यातील सर्व बंधारे भरून द्यावेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची समस्या काही प्रमाणात दूर होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. भुसे यावेळी म्हणाले, सहकार राज्यमंत्री असताना कागदावरच्या संस्था बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. सहकारातल्या अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न असतो. कष्टकरी माणूस खात्याचा केंद्रबिंदू असून त्याला स्वच्छ पाणी, आरोग्य व दर्जेदार शिक्षण मिळावे या त्रिसूत्रीवर आधारित काम करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.