नाशिक : जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, धुळे या लोकसभा मतदार संघाची निवडणूक होत असून नाशिक जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा मतदार संघनिहाय ३ हजार ५०३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कायदासुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली ४ हजार २८१ पोलीसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. बाहेरून विशेष बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश विशेष पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या प्रत्येकी तीन तुकड्याही बंदोबस्तासाठी दाखल झाल्या आहेत.जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण अशा १२ विधानसभा मतदार संघ आहेत. या संघनिहाय मतदानप्रक्रीया सोमवारी (दि.२९) पार पडणार आहे. अद्याप जिल्ह्यात निवडणूक कालावधीत प्रचार-प्रसार, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, दौरे शांततेत पार पडले आहे. ग्रामीण पोलिसांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होताच अवैध दारूभट्टया उद्ध्वस्त करण्याबरोबरच सराईत गुन्हेगारांची धरपकड, अवैध शस्त्रास्त्रे जप्त करण्यावर भर दिल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले. जिल्ह्यातून बहुतांश सराईत गुन्हेगारांना तडीपारदेखील करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात कोठेही कोणत्याहीप्रकारे अनुचित पक्रार अद्याप घडल्याची नोंद होऊ शकली नाही.सिंह यांनी सुक्ष्म नियोजन करत निवडणूकीच्या अंतीम टप्प्यात चोख असा बंदोबस्त जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये तैनात केला आहे. शहराप्रमाणे जिल्ह्यातदेखील ४८ संवेदनशील मतदान केंद्रे असून त्या ठिकाणी जादा पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे. सुमारे अडीच हजार होमगार्ड निवडणूक बंदोबस्तावर जिल्ह्यात राहणार आहे.जिल्ह्यात मतदानप्रक्रियेदरम्यान, कोठेही कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी दस्तुरखुद्द सिंह या वैयक्तिक लक्ष देत असून पोलीस बंदोबस्ताची आखणी त्यांनी विशेष पध्दतीने केली आहे. एकूणच जिल्ह्यातील १२ मतदारसंघातील साडे तीन हजार मतदान केंद्रांवर चोख सुरक्षाव्यवस्था पहावयास मिळणार आहे.असा आहे बंदोबस्तपोलीस अधिक्षक -१अपर पोलीस अधिक्षक-२उप अधिक्षक- १२पोलीस निरिक्षक - ३६सहायक निरिक्षक / उपनिरिक्षक- १५२पोलीस शिपाई- ४ हजार ७८मध्यप्रदेश विशेष पोलीस फोर्स- ३ तुकड्याराज्य राखीव पोलीस फोर्स- ३ तुकड्या
जिल्ह्यात साडेतीन हजार केंद्रांवर साडेचार हजार पोलीसांचा फौजफाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 5:25 PM
जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण अशा १२ विधानसभा मतदार संघ आहेत. या संघनिहाय मतदानप्रक्रीया सोमवारी (दि.२९) पार पडणार आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यातदेखील ४८ संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यातील १२ मतदारसंघात साडे तीन हजार मतदान केंद्र