नाशिक : कोरोनाबाधित संख्येने शनिवारी (दि, २०) पुन्हा अडीचशेचा आकडा ओलांडून २५२ पर्यंत पोहोचला, तर अवघे ६२ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान शहरात १ तर ग्रामीणला २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २०८५ पर्यंत पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६०६ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ७९० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १,७३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.८१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.३८, नाशिक ग्रामीण ९६.२७, मालेगाव शहरात ९२.१६, तर जिल्हाबाह्य ९३.८९ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २६ हजार ७९० असून, त्यातील चार लाख ६ हजार ५३५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १९ हजार ६०६ रुग्ण बाधित आढळून आले असून, ६१९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.