लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. नाशिकमध्येही कोरोना संशयित दाखल झाल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नाशिक शहर, जिल्ह्णात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्णा रुग्णालयासाठी आणखी चार व्हेंटिलेटरची मागणी नोंदविली.अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क व सॅनिटायझर यांचा कृत्रिम तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा घालण्यासाठी जिल्ह्णातील विपश्यना केंद्रावर येणाºया परदेशी नागरिकांना रोखण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असून, यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता बाळगणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, परदेशातून आलेल्या एकूण २२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी लक्षणे जाणवलेल्या पाच रु ग्णांची तपासणी केली असता ते रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तसेच परदेशातून आलेल्या रु णांना १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांची त्यांच्या घरीच नियमित तपासणी केली जात आहे. याबाबत सर्व खासगी रु ग्णालयाना सूचना देण्यात आलेल्या असल्याचे मांढरे यांनी सांगितले.नाशिकमधील कोरोनाचा पाचवा संशयितही निगेटिव्हशहरातील जिल्हा रुग्णालयात रविवारी कोरोनाचा संशयित म्हणून दाखल झालेल्या रुग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुस्कारा सोडला. नाशिकमध्ये कोरोनाचे संशयित पाचही रुग्ण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.