नाशिक : घराच्या वाहनतळात उभी केलेली वाहनेही सुरक्षित राहिलेली नाही. चोरट्यांकडून कधी वाहने तर कधी वाहनांमधील सुटे भाग, तर कधी चक्क ज्या चाकांवर चारचाकी उभी आहे, ती सर्व चाके खोलून लंपास क रण्यापर्यंत मजल गेली आहे. यामुळे नाशिककरांना यापुढील काळात अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. सारडा सर्कल भागात अशीच घटना उघडकीस आली आहे.सदर घटना सारडा सर्कलवरील उमा शंकर सोसायटीत घडली. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, मोहियोद्दीन फकरूद्दीन (७१) यांच्या राहत्या घरातील वाहनतळात त्यांची मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच १२, एफके १६१५) नेहमीप्रमाणे उभी होती. या मोटारीची चारही चाके मॅकव्हीलसह चोरट्यांनी लांबविली. ही घटना रविवारी (दि.५) घडली होती. ६० हजार रु पये किमतीच्या मॅकव्हीलसह मोटारीची चाके चोरी झाल्याची फिर्याद मोहियोद्दीन यांनी भद्रकाली पोलिसांकडे दाखल केली होती. या गुन्ह्याचा संयुक्त तपास भद्रकाली पोलीस व गुन्हे शाखा युनिट १च्या पथकाकडून केला जात होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला चोरट्यांना बेड्या ठोकण्यास यश आले आहे. दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोटारीची चार चाके, एक दुचाकी, मोटारींच्या ९ बॅटºया असा सुमारे १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तपासात देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील ट्रकच्या तीन बॅटºया चोरीचा, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वरील गुन्हा व पंचशीलनगरमधून चोरलेली अॅक्सेस मोपेड दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित समीर हमीद शहा (रा. गंजमाळ), इरफान नईम शेख (ढिकले मळा, जेलरोड) यांना अटक केली आहे.
चारचाकीची चारही चाके गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:56 AM
घराच्या वाहनतळात उभी केलेली वाहनेही सुरक्षित राहिलेली नाही. चोरट्यांकडून कधी वाहने तर कधी वाहनांमधील सुटे भाग, तर कधी चक्क ज्या चाकांवर चारचाकी उभी आहे, ती सर्व चाके खोलून लंपास क रण्यापर्यंत मजल गेली आहे. यामुळे नाशिककरांना यापुढील काळात अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. सारडा सर्कल भागात अशीच घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देचोरटे ताब्यात : दुचाकीसह नऊ बॅटऱ्या हस्तगत; गुन्हे शाखेला यश