दिंडोरी- येथील नाशिक कळवण रोडवरील कृष्णा ट्रेडिंग कंपनीच्या गुदामातून द्राक्षबागांसाठीच्या तारा, अँगल, हार्डवेअर साहित्य, व सिमेंटची चोरी करणाºया चौघाना पोलिसांनी गजाआड केले आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खतवड ता. दिंडोरी येथून अटक केली असून त्या चोरांकडून चार लाख ९३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून ज्याने चोरीचे साहित्य विकत घेतले, त्यालाही अटक करण्यात आली आहे . कृष्णा गायकवाड रा ,इंदोरे ता दिंडोरी यांच्या गुदामातून गेल्या सहा महिन्यांपासून साहित्याची चोरी होत असल्याची तक्र ार दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत खतवड येथे शेतीसाठी लागणाºया साहित्यांची कमी भावात विक्र ी होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना लागली होती .ग्रामीण पोलिसांचे पथक तयार करून माहिती घेतली असता हा माल चोरीचाच असल्याची खात्री पटली व संशयित हेमराज महाले ( २४ ,रा.नळवाडपाडा), खंडेराव साळुंखे (३१ रा. खतवड), रमेश रहेरे (३५ रा, दिंडोरी ), भाऊसाहेब महाले (२५, रा. नळवाडपाडा) या चौघांना सापळा रचून अटक करण्यात आली. हे चारही संशयित कृष्णा ट्रेडिंग कंपनीत गुदाम किपर म्हणून कामाला होते. हे साहित्य विकत घेणारा संशयित रावसाहेब निवृत्ती मुळाणे (३५ रा.- खतवड) यालाही अटक करण्यात आली आहे .त्यांच्याकडून ७३ तारांचे बंडल एकूण ५ हजार ७७३ किलो वजनाचे व सुमारे चार लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबधित चोरांना दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरी उघडकिस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधिक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक मिच्छंद्र रणमाळे,सहाययक रवी शिलावट,पोलीस हवालदार दिपक अिहरे, गणेश वराडे, पुंडलिक राऊत, दत्तात्रय साबळे, नामदेव खैरनार, संजय गोसावी, जे के सूर्यवंशी, पो कॉ अमोल घुगे, विश्वनाथ काकड, हेमंत गिलिबले, प्रदीप बहिरम या पथकाने आरोपींना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.
गुदामातून द्राक्षबागांच्या तारा चोरणारे चौघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:29 PM