नाशिक : शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही; मात्र यावर्षी एप्रिल महिनाअखेर ४१.७ अंश इतके तापमान नोंदविले गेल्यामुळे नाशिक करांच्या जिवाची काहिली झाली. शहरात उन्हाचा कहर नाशिककरांनी अनुभवला. मालेगावमध्ये ४२.६ अंश इतके तापमान नोंदविले गेले.मागील बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहे. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीवर पोहचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काही अंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारी अचानकपणे वातावरणात उष्मा वाढला व वाऱ्याची गती मंदावल्याने मागील चार वर्षांपेक्षा अधिक ४१.७ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा पोहचला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही. सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता आहे. किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके नोंदविले गेले.एप्रिलअखेर प्रखर उन्हाची तीव्रता नागरिक अनुभवत आहेत. १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. २८ मार्च रोजी या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले; मात्र ही नोंद शुक्रवारी मागे पडली. ४१.७ अंशांपर्यंत कमाल तापमान पोहचल्याने नाशिककर उन्हाच्या चटक्याने अक्षरश: भाजून निघाले.आठवड्याचे कमाल तापमान१९ एप्रिल : ३७.३२० एप्रिल : ३८.०२१ एप्रिल : ३७.७२२ एप्रिल : ३८.२२३ एप्रिल : ४०.१२४ एप्रिल : ४०.९२५ एप्रिल : ४०.५
चार वर्षांतील तापमानाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:47 AM