नाशिक : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी शनिवारी चौथा कॅप राउंडसाठी प्रारूप यादी जाहीर झाली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना एआरसी केंद्रात १ आॅगस्टपर्यंत उपस्थित राहून मूळ कागदपत्र सादर करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज सादर करून तो निश्चित क रून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येणार आहे. अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० जुलै ते १ आॅगस्ट चौथ्या फेरीसाठी नव्याने आॅप्शन फॉर्म भरून द्यावे लागणार असून, ५ आॅगस्टला चौथ्या फेरीच्या जागांचे वाटप होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ आॅगस्टपर्यंत जागा मिळालेल्या महाविद्यालात प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी चौथ्या फेरीमध्ये भाग घेण्यासाठी नवीन विकल्प अर्ज भरावा लागणार आहे. अथवा पूर्वीचाच विकल्प अर्ज विचारात घेण्याबाबतची कार्यवाही आॅनलाइन पद्धतीने करणे अनिवार्य आहे. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुमारे एक महिन्यापासून सुरू असल्याने महाविद्यालय सुरू होण्यासही विलंब होत आहे.
अभियांत्रिकी पदवीसाठीच्या चौथा ‘कॅप राउंड’ला प्रारंभ
By admin | Published: August 01, 2016 1:02 AM