शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आठवडाभरात चौथ्यांदा बाधित संख्या दोनशेपल्याड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:31 AM

नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेपासूनच्या आठवडाभरात चौथ्यांदा कोरोनाबाधित संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (दि. १५) कोरोना बाधितांच्या संख्येत २०९ ने वाढ झाली असून २२१ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

ठळक मुद्देनागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचा विसर पडल्यासारखेच त्यांचे वर्तन

नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेपासूनच्या आठवडाभरात चौथ्यांदा कोरोनाबाधित संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (दि. १५) कोरोना बाधितांच्या संख्येत २०९ ने वाढ झाली असून २२१ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ११ फेब्रुवारीला २०६ तर १२ फेब्रुवारीला २९६ पर्यंत पोहोचली होती. तर १५ फेब्रुवारीलादेखील बाधितांचा आकडा २०४ होता. त्यामुळे या आठवड्यात काही प्रमाणात तरी कोरोना वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने जनजागृतीचे काम सुरूच असले तरी अनेक नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचा विसर पडल्यासारखेच त्यांचे वर्तन आहे.दरम्यान, बुधवारी नाशिक शहरला २ आणि ग्रामीणला एक याप्रमाणे तिघांचे निधन झाल्याने एकूण मृतांची संख्या २०७७ वर पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १८ हजार ७२२ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ४६३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१८२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२५ वर पोहोचली आहे.त्यात नाशिक शहरात ९७.९१, नाशिक ग्रामीण ९६.४७, मालेगाव शहरात ९३.०३, तर जिल्हाबाह्य ९४.२१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २२ हजार ४६६ असून, त्यातील चार लाख २ हजार ५४४ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १८ हजार ७२२ रुग्ण बाधित आढळून आले असून, १२०० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल