नाशिक : दीपाेत्सव पर्वातील परंपरेनुसार बुधवारी नरक चतुर्दशीच्या निमित्ताने पहाटे काकड आरतीनंतर काळारामाला तेल, उटणे आणि सुवासिक द्रव्यांनी स्नान घालण्यात आले. नवीन वस्त्र तसेच पारंपरिक दागिने आणि आभूषणाचा साज चढविण्यात आला. देवाला सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. दिवाळीनिमित्त हजारो भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले. दरम्यान, सायंकाळी मंदिरात परंपरेनुसार लक्ष्मीपूजनाचा सोहळादेखील उत्साहात पार पडला.