वणी : द्राक्ष उत्पादकांकडुन द्राक्षे खरेदी करु न पैसे बुडविणार्या खेडगावच्या द्राक्ष व्यापार्यावर गुन्हा वणी पोलीसांनी दाखल केला आहे.याबाबतची माहीती अशी की, मोहन काशीनाथ जाधव यांचे १ लाख १३ हजार, केशव गटकळ यांचे १ लाख ७ हजार रा मातेरेवाडी शिवार, खेडले येथील पांडुरंग शंकर घाडगे यांचे १ लाख रु पयांचे वरखेडा शिवारातील पंढरीनाथ देवराम भुसाळ यांचे २ लाख ३० हजार रु पयांचे देवेन्द्र शंकर पेनमहाले यांचे १ लाख रु पयांची द्राक्षे दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील द्राक्ष व्यापारी निलेश बाळासाहेब दवंगे यांनी खरेदी केली.मात्र सदर उत्पादकांचे पैसे दिले नाही. वेळोवेळी मागणी करु नही पैसे देण्यास टाळाटाळ केली तसेच वेळ मारु न नेण्यासाठी दिंडोरी येथील एका राष्ट्रीय कृत बँकेचे धनादेश दिले. मात्र धनादेश वटले नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याने या व्यापाºयाविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी परीसरातील ५ द्राक्ष उत्पादकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 4:07 PM
वणी : द्राक्ष उत्पादकांकडुन द्राक्षे खरेदी करु न पैसे बुडविणार्या खेडगावच्या द्राक्ष व्यापार्यावर गुन्हा वणी पोलीसांनी दाखल केला आहे.
ठळक मुद्दे६ लाख ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ ; खेडगावच्या व्यापाऱ्यावर गुन्हा