नाशिक : भगूरमधील एका प्लॉटमालकाची बनावट सही व पतसंस्थेत दिलेल्या फोटोचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़फर्नाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित संदीप गवळी (रा़ भगूर), मनीषा बस्ते (देवळाली कॅम्प), आनंदा सासरे (भगूर) व सायरा शेख (संसारी गाव) यांनी संगनमत करून फर्नाज शेख यांचा भगूर येथील सर्व्हे नंबर २५/०९/०२ नंबरचा प्लॉट हा बनावट दस्तऐवज व खोट्या सह्या करून फसवणूक केली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बनावट स्वाक्षरीद्वारे फसवणूक
By admin | Published: September 30, 2015 11:52 PM