शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पावणेदोन कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 1:58 AM

हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या तिकिटाची रक्कम जुन्या नाशकातील टूर व्यावसायिकाने दीपालीनगर येथील फिर्यादी व्यावसायिकाला परत केली नाही. तसेच दिलेले धनादेश बॅँकेतून वठलेही नाही, त्यामुळे आपली पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी अशपाक रमजान पठाण (३२) यांनी संशयित व्यावसायिकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देहज-उमराह टूर्स : चार संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या तिकिटाची रक्कम जुन्या नाशकातील टूर व्यावसायिकाने दीपालीनगर येथील फिर्यादी व्यावसायिकाला परत केली नाही. तसेच दिलेले धनादेश बॅँकेतून वठलेही नाही, त्यामुळे आपली पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी अशपाक रमजान पठाण (३२) यांनी संशयित व्यावसायिकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १ आॅगस्ट २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ या कालावधीपर्यंत दीपालीनगर येथील अल-खैर टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सचे संचालक पठाण यांच्याकडे संशयित आरोपी अब्दुल मतीन मनियार (रा. पॅराडाईज हाइट्स, वडाळारोड), अजीज बनेमिया मनियार, जावेद हनीफ शेख (रा. सेक्टर-२ वाशी, नवी मुंबई), समीर मनियार (काजीपुरा, जुने नाशिक) यांनी त्यांना काही प्रवासी विमानतळावर अडकले असल्याने ‘आम्ही अडचणीत आलो आहोत, तुम्ही त्यांचे तिकीट काढून द्यावे, आम्ही तुम्हाला तिकिटाच्या रकमेचे धनादेश देऊ’ असे सांगून विश्वास संपादन केल्याचे फिर्यादित म्हटलेआहे.ठरलेल्या व्यवहारानुसार १ कोटी ७५ लाख ११ हजार ३२८ रुपये दिले नाही त्यामुळे पठाण यांनी या चौघांविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व संशयितांमध्ये यापूर्वीही असे आर्थिक व्यवहार झाले आहेत. तिकिटासाठी फिर्यादीने भरलेली रक्कम व नफा, असा दुहेरी आर्थिक फ टका त्यांना बसला आहे. चौघांनी आपापसात संगनमत क रून पूर्वनियोजित कट-कारस्थान रचून विश्वासघात केल्याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे. संशयितांनी त्यांना त्या रकमेचा धनादेशही दिला; मात्र बॅँक खात्यात धनादेशावरील रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वठू शकला नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे पठाण यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नंदवाळकर करीत आहेत.व्यवहाराची रक्कम दिली नाहीहज, उमराह यात्रेसाठी जाणाºया भाविकांना खासगी टुर्समार्फत प्रवास सुविधा पुरविण्याचा पठाण यांचा व्यवसाय दीपालीनगरमध्ये आहे. त्यांनी वर्षभरापूर्वीच हा व्यवसाय सुरू केल्याचे समजते. संशयित चौघेदेखील हज-उमराह यात्रा टुर्सचा व्यवसाय करतात, त्यांनी पठाण यांच्यामार्फत सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकीट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय