याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडवा ॲग्रिकल्चर कंपनीच्या नावाने जोपूळ येथील भगवान उद्धव उगले, चंद्रभान नारायण उफाडे, रावसाहेब लक्ष्मण जाधव, सुभाष पुंडलिक कड आणि कुसूम विष्णू तडाखे या शेतकऱ्यांकडून एकूण १४ लाख २४ हजार रुपयांची द्राक्षे खरेदी करण्यात आली होती. याबदल्यात संबंधितांना त्या रकमांचे धनादेश देण्यात आले होते. मात्र, धनादेश वटू नये व उत्पादकांना द्राक्षमालाचे पैसे मिळू नयेत, यासाठी संबंधितांनी स्टॉप पेमेंट करून रक्कम गोठविली. त्यानंतर संगनमताने कट रचून फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दिल्याने अमित अरुण देशमुख (राहणार इंदिरा आवास कॉलनी), आमलाय आगले (शहाजापूर, मध्यप्रदेश), भूषण दिलीप पवार (प्लॉट नंबर ८३, सुदर्शन कॉलनी, विद्यानगरी, देवपूर, धुळे) विशाल मारुती विभुते (रा. गल्ली नंबर ५, धुळे) अमोल अविनाश चव्हाण, अविनाश चव्हाण (दोघेही रा. बी-१३ रो हाऊस, कुंभारे गार्डन, कोथरूड, पुणे), सागर गजानन जगताप (रा. ढकाळे, ता. बारामती, पुणे), संतोष तुकाराम बोराडे (रा. थेरगाव, ता. निफाड), प्रशांत ज्ञानदेव भोसले, दीपक ज्ञानदेव भोसले, सयाजीराव दीपक भोसले (तिघे रा. ९०३, किंगवै, विटी कवडे रोड, घोरपडी, पुणे) या दहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, पी. टी. जाधव हे अधिक तपास करत आहेत.
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक; दहा संशयितांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:11 AM