अकोला : नाशिकच्या आॅसम इंडिया हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ९९९ रुपये गुंतवणूक केल्यास काही काळानंतर तब्बल २० लाख रु पयांचा मोबदला मिळणार असल्याचे आमिष देऊन शेकडो अकोलेकरांना ठगविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीच्या दोन संचालकांना अकोला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली आहे. छत्रपती सदाफळे व श्रीकृष्ण राऊत असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.नाशिक येथील आॅसम इंडिया हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अत्यंत अल्प रक्कम गुंतवणूक केल्यानंतर तब्बल २० लाख रु पयांच्यावर मोबदला देण्याचे आमिष या कंपनीचे संचालक छत्रपती सदाफळे व मुख्य प्रवर्तक श्रीकृष्ण राऊत या दोघांनी अकोलेकरांना दिले होते. त्यामुळे या कंपनीने अकोल्यातही कार्यालय थाटून कंपनीचे दोनकार्यक्र म अकोल्यातील दोन मोठ्या हॉटेलमध्ये पार पाडले होते. यामधील पहिल्या कार्यक्र मात अकोलेकरांनी ९९९ रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यांना तब्बल २० लाख रु पयांचा मोबदला देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. या योजनेला अकोलेकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर फसवणूकीचा प्रकार पुढे आला. असाच प्रकार एका मिहलेसोबत ही घडल्याने तिने या प्रकरणाची तक्र ार पोलिसांकडे केली. यावरून अकोला आर्थिक गुन्हे शाखेने सदर प्रकरणाचा तपास करून या कंपनीच्या छत्रपती सदाफळे व श्रीकृष्ण राऊत या दोन संचालकांना नाशिक येथून अटक केली. हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.कंपनीने काही दिवसातच दुसº्या एका मोठ्या हॉटेलमध्ये कार्यक्र म आयोजित करून ९९९ रु पयांची रक्कम २ हजार ५०० रु पय केली. त्यानुसार जो व्यक्ती २ हजार ५०० रु पये गुंतवणूक करेल त्याला काही काळानंतर तब्बल वीस लाख रु पये मोबदला देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यामुळे या ठिकाणीही अकोलेकरांनी अडीच हजार रुपयांची गुंतवणूक केली. बराच काळ उलटल्यानंतरही मोबदला मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.
गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 12:51 AM
नाशिकच्या आॅसम इंडिया हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ९९९ रुपये गुंतवणूक केल्यास काही काळानंतर तब्बल २० लाख रु पयांचा मोबदला मिळणार असल्याचे आमिष देऊन शेकडो अकोलेकरांना ठगविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीच्या दोन संचालकांना अकोला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली आहे. छत्रपती सदाफळे व श्रीकृष्ण राऊत असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
ठळक मुद्देअकोलेकरांना गंडा : रॅकेट असण्याची शक्यता