इगतपुरी : मेसचा ठेका देण्यासाठी डीडी काढण्यासाठी इगतपुरीला बोलावून १२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला इगतपुरी पोलिसांनी अंबड सातपूर येथील राहत्या घरातून जेरबंद केले. संबंधितावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत फसवणूक आणि अन्य असे ९पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
संशयित आरोपी रोहिदास रामचंद्र भामरे (वय ५६, रा. नाशिक) याने फिर्यादी वैभव संतोष लकडे (२२ वर्षे, व्यवसाय- खानावळ मेस, रा. टीव्ही सेंटर, एम-२ रोड नं. ९ हुडको, औरंगाबाद) यांना इगतपुरी येथे बोलावून घेतले. मेसचा ठेका देण्यासाठी ही भेट ठरवली गेली. या कामासाठी रोहिदास भामरे याने फिर्यादी वैभव लकडे आणि साक्षीदार आकाश राठोड (रा. औरंगाबाद, इगतपुरी कोर्ट) याला बँकेत डीडी काढण्यासाठी इगतपुरी येथील स्टेट बँक शाखेत जाऊन थांबण्यास सांगितले. यावेळी मेसच्या ठेक्यासाठी आणलेली १२ हजाराची रोख रक्कम लकडे हे आकाश राठोड याच्याकडे देऊन बँकेत निघून गेले.
त्यावेळी रोहिदास भामरे याने आकाश राठोड याला आधारकार्डची झेरॉक्स काढण्यास सांगितले. मी कागदपत्र तयार करतो, तु झेरॉक्स घेऊन ये, असे सांगून त्याच्याकडील रोख १२ हजार रुपये रक्कम घेऊन रोहिदास भामरे पळून गेला.
याबाबत वैभव संतोष लकडे यांनी इगतपुरी पोलिसांकडे ४ सप्टेंबरला फिर्याद दाखल केली. इगतपुरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
----------------
इगतपुरी पोलीस ठाण्यात संशयित अट्टल आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद. (०८ इगतपुरी)
080921\08nsk_13_08092021_13.jpg
०८ इगतपुरी