नाशिक : एका गुन्ह्यात अटक झालेल्या दोघा संशयितांना त्या गुन्ह्यातून मुक्त करण्याच्या नावाखाली ठगबाजाने ३२ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचा धक्क ादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी गौरव दादासाहेब ठाकूर (रा. संगमेश्वर, ता. मालेगाव) यांच्या तक्रारीनुसार यांचे काका व मित्र यांना एका गुन्ह्यात पंचवटी पोलिसांनी अटक केली. ‘पोलिसांमध्ये आपली खूप ओळख असून, पैसे देऊन आपण त्यांना सोडवू शकता’ असे संशयित मयूर महाजन याने सांगत ठाकूर यांचा विश्वास संपादन केला. दोघांना सोडविणे व गुन्ह्यात जप्त झालेले वाहन पुन्हा बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून ३२ हजार रुपये घेतले. मात्र यानंतर महाजन याने काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाकूर यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल केली आहे.---अल्पवयीन मुलाची आत्महत्यानाशिक : शहरात अल्पवयीन मुलामुलींसह तरुणांच्या आत्महत्येचे प्रकार सुरूच आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जेलरोड पंचक गावाच्या परिसरात अशाच एका तेरा वर्षीय मुलाने चक्क गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.प्रथमेश राजेंद्र सूर्यवंशी (१३, रा. आयोध्यानगरी) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश याने १८ जुलै रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब तत्काळ निदर्शनास येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र मानेला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गुन्ह्यातून मुक्ततेच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 6:42 PM
दोघांना सोडविणे व गुन्ह्यात जप्त झालेले वाहन पुन्हा बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून ३२ हजार रुपये घेतले.
ठळक मुद्देसंशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाअल्पवयीन मुलाची आत्महत्या