शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:40 AM

सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़

नाशिक : सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित विकासक दीपक कचरू हांडगे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सरकारवाडा पोलीस ठाण्यात द्वारकानाथ चुनीलाल लढ्ढा (७७, रा. विमल हाईट्स, आनंद लाँड्रीच्या मागे, पंडित कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या पंडित कॉलनीतील सर्व्हे नंबर ६५९/५/४/१ येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटचा फ्लॅट नंबर २ हा त्यांची मुलगी उल्का आनंद राठी यांच्या नावावर आहे. संशयित दीपक हांडगे याने दि. २३ सप्टेंबर २०१३ ते दि. १० जून २०१८ या कालावधीत प्रथमेश अपार्टमेंट पुनर्विकसित करून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर २३ सप्टेंबर २०१३ रोजी पुनर्विकसित करण्याची नोंद करून घेतली.  करारनाम्यात चोवीस महिन्यांत पुनर्विकसित केलेल्या फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरलेले असल्याने संशयिताने ९ जून २०१८ रोजी लढ्ढा यांना फ्लॅट नंबर ५०१ ची चावी दिली़ मात्र संशयिताकडे वारंवार मागणी करूनही ताबा पावती दिली नाही. त्यानंतर संशयित हांडगे याने सप्टेंबर २०१५ मध्ये विशाल जोशी व उमेश जोशी यांना फ्लॅटचे साठेखत करून देत लढ्ढा यांच्या मुलीची फसवणूक केली.महिलेचे मंगळसूत्र खेचलेपादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड दत्तमंदिराजवळील राजधानी चौक परिसरात घडली़  भगूर परिसरात विजयनगरमधील रहिवासी आकांक्षा संदीप पाटील या सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या दोन बहिणींसह नाशिकरोडजवळील राजधानी चौकाजवळून पायी जात होत्या़ यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने आकांक्षा पाटील यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची साडेतीन तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून नेली.  याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़चोरट्यास पाठलाग करून पकडलेकुणालनगर येथून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढणाऱ्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील संशयितास परिसरातील नागरिकांनी पकडून आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केल़े संतोष प्रकाश खैरनार असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. कोणार्कनगर येथील रहिवासी वर्षा संतोष कोठुळे या सोमवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास श्रीरामनगर येथील शाळेतून मुलाला आणण्यासाठी गेल्या होत्या़ मुलाला शाळेतून घेतल्यानंतर त्या घराकडे पायी जात असताना संशयित खैरनार याने त्यांच्या पाठीमागे येऊन गळ्यातील २४ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी ओढून पळ काढला. या घटनेनंतर वर्षा कोठुळे यांच्यासह शाळेजवळील काही महिलांनी आरडाओरड केल्यावर नागरिकांनी संशयिताचा पाठलाग करून त्यास पकडले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व खैरनार यास अटक केली़ दरम्यान, संशयित खैरनार याच्याकडून सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़दुचाकीची चोरीदिंडोरीरोड तारवालानगर परिसरातील योगीराज अपार्टमेंटमधील रहिवासी राकेश शहा यांची ४५ हजार रुपये किमतीची यामाहा कंपनीची दुचाकी (एमएच १५, एफजे ६३६५) अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस