नाशिक : शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होत असल्याची दिशाभूल करत लाखो रुपयांचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जतीन छेदी चौहाण (रा. कामोठे, पनवेल, जि. रायगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एम. के. ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (शरणपूर रोड) व संशयित बाळासाहेब रतन बागुल (रा. समर्थनगर) यांनी संगनमताने चौहाण यांची आर्थिक फसवणूक केली. चौहाण यांनी २०१९ मध्ये एम. के. ग्लोबल फायनान्शियल कंपनी डिमॅट अकाऊंट उघडले व मोबाइल सर्व्हिसेसकरिता संशयित बागूल यांचा मोबाइल नंबर केवायसी व डिमॅट खात्याला लिंक केला. चौहाण यांच्या रकमेवर ०.५ टक्के लॉसलॉक लावून ट्रेड करण्याची अट घालण्यात आली. ६५ लाखांची गुंतवणूकफिर्यादीस १७ ते २१ ऑगस्ट २०१९ दरम्यान ६५ लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुंतवणुकीच्या रकमेच्या ट्रेडिंगमधून संशयित बागूल याने ९ लाख ७१ हजार रुपये व एम. के. कंपनीने ४ लाख १५ हजार अशी एकूण १३ लाख ८६ हजार रुपये ब्रोकरेज मिळवण्याच्या उद्देशाने गुंवतणुकीवर फायदा होत असल्याचे सांगत फिर्यादीची दिशाभूल केली. तसेच गुंतवणूक केलेल्या सर्व रकमांचे ट्रेडिंगमध्ये नुकसान करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
‘शेअर’मध्ये नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 1:16 AM