नाशिक : भावी पती सरकारी नोकरीला आहे, असे खोटे सांगून त्याच्यासोबत विवाह लावून तरुणीची फसवणूक केल्याची घटना दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडली आहे़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तरुणीच्या पतीसह त्याच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ म्हसरूळ पोलीस ठाण्यात स्वाती प्रवीण गांगुर्डे (२९, रा़ गणेश अपार्टमेंट, पोकार कॉलनी, आरटीओ कॉर्नरजवळ, दिंडोरीरोड, नाशिक) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहापूर्वी भावी पती प्रवीण हिरामण गांगुर्डे हा सरकारी नोकरीस आहे, असे खोटे सांगून संशयित हिरामण रामजी गांगुर्डे (सासरे), लीलाबाई हिरामण गांगुर्डे (सासू), सागर हिरामण गांगुर्डे (दीर), संतोष वाघ, निर्मला राजेंद्र भडांगे यांनी विवाह लावून फसवणूक केली़ या विवाहानंतर पती व संशयितांनी १ एप्रिल २०१५ ते २६ मार्च २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत शारीरिक व मानसिक छळ केला़ तसेच माहेरून दिलेले स्त्रीधन काढून घेतले़ या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरीला असल्याचे सांगत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:51 AM