जळगाव नेऊर : आरटीईअंतर्गत खासगी विना अनुदानित स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे ३३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांनी आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे यांनी सांगितले.येवला तालुक्यातील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम स्कूल (अंदरसूल), स्वामी मुक्तानंद स्कूल (येवला), जय बाबाजी स्कूल (नगरसूल), जीवन अमृत स्कूल (मुखेड), आर्या निकेतन स्कूल (पारेगाव), अभिनव बालविकास स्कूल (येवला), ओम गुरुदेव स्कूल (येवला), आत्मा मालिक स्कूल (पुरणगाव), कांचनसुधा स्कूल (येवला), अभिनव बालविकास स्कूल (पाटोदा), विद्या इंटरनॅशनल स्कूल (धानोरे), इंद्रकमल स्कूल (सावरगाव), राधिका स्कूल (अंदरसूल), संत भगवान बाबा स्कूल (राजापूर), श्री छत्रपती शिवाजी महाराज स्कूल (निमगाव मढ), विश्वलता स्कूल (भाटगाव), कांचनसुधा स्कूल (धानोरे), गणाधीश स्कूल (राजापूर), श्री साईनाथ स्कूल (धूळगाव), फिनिक्स स्कूल (भारम), राजेश कदम स्कूल (नेऊरगाव), राधिका स्कूल (आडगाव), बनकर पाटील स्कूल (अंगणगाव), लक्ष्मी स्कूल (विखरणी), साई ग्रीन स्कूल (नगरसूल), संतोष स्कूल (राहाडी), सरस्वती स्कूल (सायगाव), एसएनडी स्कूल (बाभूळगाव), मातोश्री इंटरनॅशनल स्कूल (धानोरे), ऋषी स्कूल (बाभूळगाव), अभिनव बालविकास मंदिर (मुखेड), कांचनसुधा इंटरनॅशनल स्कूल व ज्यु. कॉलेज (धानोरे) व संतोष स्कूल (जळगाव नेऊर) या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश दिला जाणार आहे़निकष : पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला, पालकाचा रहिवासी पुरावा, अपंगत्वाचा पुरावा आदी कागदपत्रांसह पालकांनी संकेतस्थळावर आॅनलाइन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा. पालकांनी तत्काळ फॉर्म भरावेत अधिक माहितीसाठी रमेश गायकवाड (विस्तार अधिकारी), सुनील मारवाडी (विस्तार अधिकारी) यांच्याशी संपर्कसाधावा, असे आवाहन शिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे यांनी केले आहे. आरटीईअंतर्गत इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त पालकांनी सहभाग घेऊन आॅनलाइन फॉर्म भरावे, असे आवाहन जळगाव नेऊर येथील राजेश कदम स्कूलचे अध्यक्ष के. डी. कदम यांनी केले आहे.
आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:27 PM
आरटीईअंतर्गत खासगी विना अनुदानित स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे ३३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांनी आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे यांनी सांगितले.
ठळक मुद्देयेवला तालुक्यातील पालकांना गटशिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन