प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार, रंजना भानसी, गोरक्ष नगर मित्र मंडळाचे प्रवीण जाधव, मंडळाचे रवी गायकवाड यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सध्या नाशिक शहरात सर्वत्र रुग्णांची संख्या वाढली असून, कोरोना रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी नातेवाईकांची धावपळ होते. त्यातच अशा रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने, रुग्णांची प्रकृती खालावण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरटीओ कॉर्नर मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रवी गायकवाड यांच्या संकल्पनेतून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी सुनील निरगुड, सचिन साळुंके, किशोर महाले, राजू शिंदे, ललित दोंदे, यश शिंदे, राहुल पवार, गोटू हिरे, राजू जाधव, संतोष गाडेकर, राजू बोडके, योगेश केदारे, निवृत्ती मोरे, राकेश गायकवाड, अनिरुद्ध विसे, सार्थक ढाकणे, आदित्य चकोर उपस्थित होते.