कोणत्याही लेखकाची अशी इच्छा असणे स्वाभाविक असल्याने गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या नगरीमध्ये स्वतंत्र अशी साहित्य प्रकाशन व्यवस्था केली जाते. प्रकाशन समारंभाच्या दृष्टिकोनातून तेथे व्यासपीठ, आवश्यक ती ध्वनी व प्रकाश व्यवस्था, व्यासपीठावर टेबल-खुर्च्या राहणार आहेत. त्याशिवाय रसिक वाचकांच्या दृष्टीने खुर्च्यांची सुयोग्य बैठक व्यवस्थाही असणार आहे. अशा ठिकाणी लेखकाला आपल्या पुस्तकाचे, ग्रंथाचे प्रकाशन करण्याची सर्व व्यवस्था असणार आहे. संबंधित व्यक्ती अथवा प्रकाशन संस्थेने जर आधी कल्पना दिली तर संमेलनानिमित्त आलेल्या मान्यवर व प्रथितयश साहित्यिकांशी बोलूनही त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील.
इन्फो
विनामूल्य व्यवस्था
अशा पद्धतीने प्रकाशन करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून एक हजार रुपये अशी रक्कम घ्यावी, अशी एक सूचना आलेली होती. तथापि एकूणच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि साहित्याचाही अधिकाधिक प्रसार व्हावा या दृष्टीने कोणतेही मूल्य न आकारता अशी प्रकाशन कट्ट्याच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात येणार आहे.