विधानसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच कधी आॅक्टोबर हिटचा तडाखा, तर कधी वातावरणातील बदलामुळे उकाडा यामुळे कार्यकर्ते हैराण झाले आहेत. साहजिक पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पुरुष व महिला काही अंतर चालल्यावर घामाघूम होताना दिसतात. त्यामुळे उमेदवारांना पदयात्रेत पाण्याच्या कॅन, नाश्ता, थंडपेये आदींची व्यवस्था करावी लागते. बुधवारी एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराची प्रचारफेरी निघाली. अनेक दुकानांतील व्यापारी संकुलामधील मतदारांच्या गाठीभेटी घेत कार्यकर्त्यांची पदयात्रा नववसाहतीमधील एका चौकात येऊन थांबली. याठिकाणी झाडाची थोडी सावली असल्याने घामाघूम झालेले कार्यकर्ते विसाव्यासाठी थोडा वेळ थांबले. दुपारची वेळ होत आल्याने सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला लागले. त्यामुळे प्रचार प्रमुखाने उमेदवाराला फोनाफोनी करून नाश्ता पाठविण्याचा निरोप दिला. थोड्याच वेळाने एका रिक्षामधून समोसे आणि पाववडे आले. त्याचा खमंग वास परिसरात सुटल्याने या ठिकाणी कट्ट्यावर बसलेल्या चार तरुणांनादेखील समोसा आणि पाववडा खाण्याचा मोह आवरला नाही. वास्तव हे तरुण प्रचारात सहभागीदेखील नव्हते. ते चौघे बेमालूमपणे या कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झाले. नाश्ता खाऊन झाल्यावर पाणी पिण्याच्या बहाण्याने त्यांनी तेथून सटकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी प्रचार प्रमुखाने त्यांना अडवून सांगितले, या चला बरं आता थोडा जोश आला असेल प्रचाराला लागा. त्यातील एक तरुणाने आपल्या मित्रांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटले, फुकटचा नाश्ता खाल्ला आणि बळजबरीने प्रचार केला, असा हा प्रकार झाला.
फुकटचा नाश्ता अन् प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 1:00 AM
विधानसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच कधी आॅक्टोबर हिटचा तडाखा, तर कधी वातावरणातील बदलामुळे उकाडा यामुळे कार्यकर्ते हैराण झाले आहेत. साहजिक पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पुरुष व महिला काही अंतर चालल्यावर घामाघूम होताना दिसतात. त्यामुळे उमेदवारांना पदयात्रेत पाण्याच्या कॅन, नाश्ता, थंडपेये आदींची व्यवस्था करावी लागते.
ठळक मुद्देभटक्या