शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

जानेवारी २०२० पासून स्मार्टकार्डवरच मोफत बसप्रवास: दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:12 PM

ज्येष्ठ नागरिकांना बसप्रवास भाड्यातील सवलतीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच आधारकार्डचा उपयोग होईल. दि. १ जानेवारी २०२० पासून नवीन स्मार्टकार्ड दाखवावे लागेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी आधारकार्ड ३१ डिसेंबरपर्यंतच वैध

त्र्यंबकेश्वर : ज्येष्ठ नागरिकांना बसप्रवास भाड्यातील सवलतीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच आधारकार्डचा उपयोग होईल. दि. १ जानेवारी २०२० पासून नवीन स्मार्टकार्ड दाखवावे लागेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. एका कार्यक्रमानिमित्त ते त्र्यंबकेश्व येथे आले होते. स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत पाससंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.मुलाचा धार्मिक विधी करण्यासाठी रावते परिवारासह त्र्यंबकेश्वर येथे आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थान कार्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून स्मार्टकार्डधारकाला सुमारे चार हजार किलोमीटरचा बसप्रवास मोफत करता येतो. यासंदर्भात नागरिकांनीतक्र ारी मांडताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना भाडे सवलतीचे कार्ड मिळविण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. कार्ड काढण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या ५५रुपयांऐवजी जास्त पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.मंदिराचे विश्वस्त संतोष कदम, शिवसेना शहर संपर्कप्रमुख भूषण अडसरे, भाजपचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नंदकुमार कदम, कल्पेश कदम, प्रशांत बागडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला येणाºया भाविकांची संख्या मोठी असल्याने जादा बसगाड्यांची व्यवस्था करावी तसेच रोज सायंकाळी त्र्यंंबकहून नाशिकला जाण्यासाठी बसची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. याबाबत दखल घेऊन सायंकाळी मुक्कामाच्या जादा गाड्या सोडल्या जातील. आणि सकाळी ठरावीक वेळेच्या अंतराने बस सोडल्या जातील, असे आश्वासन रावते यांनी यावेळी दिले.दरम्यान, दिवाकर रावते यांचे मराठी भाषेवरील प्रेम प्रत्ययास आले. पूजाविधी संपल्यानंतर देवतांची आरती करण्यात आली. ब्राह्मणवर्गाने गुजराथी भाषेतून शंकराची आरती म्हणण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी, रामदास स्वामींनी सर्व देवतांच्या आरत्या मराठी भाषेतून रचल्या आहेत. तर तुम्ही गुजराथी भाषेतील आरती का म्हणता असा प्रश्न करत स्वत: लवथवती विक्र ाळा ही आरती म्हणत पूजाविधी पूर्ण केला.स्मार्टकार्डसाठी आधारकार्ड, मतदानकार्ड पाहून त्यांची नोंद करून व संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यामुळे थोडाफार वेळ तर लागणारच. हे काम खासगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे त्यांनी जादा पैसे मागितले तर याबाबतीत त्यांना सूचना देऊ. यासाठी पीआरओची नियुक्ती केली आहे. याशिवाय ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. १ जानेवारी २०२० पासून मात्र स्मार्टकार्डवरच मोफत प्रवास करता येणार आहे. आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे रावते यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटी