वटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.परिसरात दरवर्षी बिबट्यांचा संचार असतो. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, या भागात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार असल्याने पशुपालक शेतकरी धास्तावला आहे.सावतावाड शिवारात बिबट्यांचे दर्शन होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला फोनद्वारे दिली होती. मात्र वनविभागाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. ‘वनविभाग सुस्त, बिबट्या मस्त’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. वनविभागाच्या कृपेने परिसरात अवैध वृक्षतोड होते तेव्हा वनविभागाचे अधिकारी आमचा परिसर आहे असे म्हणतात, तर बिबट्याचा हल्ला होतो तेव्हा वन अधिकारी कुठे जातात, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सावतावाडी परिसरात बºयाच दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, अनेकवेळा शेतकऱ्यांना दर्शनही दिले आहे. दरवर्षी पाण्याचा शोधात बिबट्या या भागात येतो. परिसरात दुभत्या जनावरांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या ताव मारतो. परिसरात लपण्यासाठी काटेरी झुडपे असल्याने बिबट्या आपले काम फते करतो. मेंढपाळ जेरीस आले असून, दरवर्षी १० ते १२ मेंढ्यांना आपला ज जीव द्यावा लागत आहे. बिबट्याची वावर असल्यामुळे रात्र जागून काढावी लागत आहे.
असच चालत राहील तर बिबट्या लवकरच मानवी हानी होऊ शकते अस परिसरातील नागरिकांच् मत आहे. रविवारी सायंकाळी घराकडे जात असताना दोन बिबट्यांचे दर्शन झाले. मी गाडीचा हॉर्न वाजवत व मोठमोठ्यांनी आरोळ्या ठोकत जीव वाचवाला. परिसरात चार बिबटे असून, यात दोन मोठे व दोन लहान असे चार बिबटे आहेत. आज माझ्याकडे गाडी होती म्हणून जीव वाचला.- रामदास जाधव, शेतकरी, वटार
गेल्या अनेक दिवसांपासून शिवारात बिबट्यांचा संचार आहे. हे फक्त ऐकून होतो; पण रविवारी सायंकाळी मळ्यातून घरी जात असताना डरकाळीचा आवाज आला. व अचानक बिबट्या समोर आल्याने काळजाचा ठोकाच चुकला. बिबट्यांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.- शेखर खैरनार, शेतकरी वटार