जिल्हा प्रशासनाने बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. सोमवारपासून कडक लॉकडाऊन शिथिल केला असला तरी अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी कायम आहे. तरीही नागरिकांचा मुक्तसंचार सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत किराणा दुकाने उघडण्यास आणि भाजीपाला विक्रीस परवानगी असली तरी सोमवारी वेळेचे निर्बंध कोणीही पाळताना दिसून आले नाही. सातपूर पोलिसांनी मात्र अशोकनगर, कार्बन नाका, पोलीस ठाणे सर्कल या ठिकाणी नाकाबंदी कायम ठेवली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच अँटिजन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखाने सुरळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे अधिकारी यांची मुख्य रस्त्यावर वर्दळ सुरु आहे.
इन्फो :-
नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांना मदतीसाठी 'पोलीसमित्र' तैनात करण्यात आले आहेत.अशोकनगर पोलीस चौकीजवळील नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस आपले कर्तव्य सोडून झाडाखाली बसून राहत आहेत. कथित पोलीसमित्र नागरिकांवर दादागिरी करून पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार गाजवीत असल्याने सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक त्रस्त होत आहेत. पोलीस मित्र मदतीसाठी आहेत की सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब गाजविण्यासाठी आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
===Photopath===
240521\24nsk_36_24052021_13.jpg
===Caption===
सातपूरला नागरिकांना मुक्त संचार